'जिवनाची सत्यता'

Started by suraj-123, May 22, 2017, 06:38:36 PM

Previous topic - Next topic

suraj-123



रंग उडाला,गंध उडाला,
मनीचा ठाव,तुला काही सापडेना.

भितिच्या पाेटी,आशेच्या नजरी,
शाेधताे तु ,कुणाकुणाला.

स्वार्थाचे जगने,वैरीचं मनी धरने,
हीताचे नाही रे, तु फसताे कशाला.

निष्टुर काळीज, विषारी मन,
विचार कर,काय यांत मिळते तुला.

पापाची वासना,निंदेचे श्रवन,
सारेचं दुर्भाग्य देते तुला.

कष्टाचे माेल ,प्रेमाचे बाेल,
सुखाचा वसा दावील तुला.

न्यायाचे बीज, समानतेचे हित,
सार्थकी लाभेल जन्माला.

मानवतेचा वसा, अन्यायाचा लढा,
निर्मल जगण्याचा मार्ग शिकवताे तुला.....
निर्मल जगण्याचा मार्ग शिकवताे तुला....

    -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
      (९०७५८३८३५४)
        मुरबाड(ठाणे)

https://kavyasakhadnyaneshwarthorat.blogspot.com