वाटेल तेव्हढा त्रास देऊन घे मला

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 23, 2017, 05:57:19 AM

Previous topic - Next topic
तुझ्या हातांच्या रेषांत
सामावून घे मला
तुझं नशीब समजून
तुझ्याचं हृदयात जागा दे मला

विचारू नकोस मला तू
किती प्रेम आहे तुझ्यावर
खोट्या प्रेमाचं नाव करून
दडपण नको देऊस माझ्या मनावर

मी दुःख पण आहे सुख पण
आठवणीत तुझ्या नेहमीच राहूदे मला
जरी आठवणीत राहिलो नाही तुझ्या
खोटारडा म्हणून आवाज दे मला

तू आरशाच्या पलीकडं डोकावून बघ
सौंदर्य निहाळतांना मी दिसेल
स्वतःच सौंदर्य निहाळण्यात गुंग तू
सौंदर्याच्या घमंडीत जीवन माझं संपेल

मी उद्या असो किंवा नसो
उद्या ही मी असाच दिसेल तुला
तुझ्या म्हणण्या प्रमाणे वागतोय
वाटेल तेव्हढा त्रास देऊन घे मला

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर

Sandhya Shamala Shinde

sagle asech astat tyana pahije tevha javal karaych ani nako tevha durr,,, karyach