यशोमार्ग

Started by कदम, May 23, 2017, 10:40:23 PM

Previous topic - Next topic

कदम


भावनांना काही अर्थ नसतो
भावनांचा काळ स्वप्नवत असतो
हृदय स्वप्नांनी भरलेला असतो
गाव माञ स्वप्नातील कूठेच नसतो

हदयाचा पीळ काढतात भावना
दिस रोज एक नवा रोज नवी कामना
नको अशा दुःखांशी रोज सामना
रोज भावना रोज एक नवी यातना

अर्थाअर्थी जीवनांचे रंग व्यर्थ
ज्याला नाव परमार्थ तोची व्यर्थ
भावनांची मैञी वैरी यातनांशी सार्थ
काढतेच यातनांतुनी भावना यशोमार्ग