एक कविता तुझ्यासाठी.

Started by Dnyaneshwar Musale, May 23, 2017, 10:43:59 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तु आहे तर
माझ्या घराला घरपण
तु आहे तर
माझ्या चुलीला सरपण.

तु आहे तर
खिडक्या सुद्धा हसतात
नसेल तर भांडी
सुद्धा रुसतात.

तु असेल तर
दरवळतो मोगऱ्याचा सुगंध
रुजवत असतेस प्रत्येकाशी
एक प्रेमाचा ऋणानुबंध.

तु असतेस तेव्हा
तेवत राहतो देव्हाऱ्यातला दिवा
भुक नसतानाही खावा
वाटतो तुझ्या हातचा गोड गोड रवा.

तु असताना लागतात
माझ्या शर्टची व्यवस्तीत बटणं,
रागाच्या भरात मलाही आवडत
तुझं लालबुंद डोळ्यांनी पेटणं.

खरं तर मी रोजच म्हणतो
तुझ्याशिवाय माझं
काही अडत नाही,
पण तुझ्या शीवाय
मला कच्ची दारू ही चढत नाही.

सकाळीच कंगव्यात अडकलेली
तुझी लांब लांब केस मी कधी काढतं नाही,
उलट दोन चार देतो  शिव्या तुला
पण घाई घाईत तु करत असते
माझ्यासाठी  डबा, याच भान कधीच नसत मला.

कधी कधी वाटतं नको
तुझा तो नाकावरचा राग रुसवा,
क्षणात विरघळणारा तो ही
असतो फसवा.

जेव्हा तु घरात असते तेव्हा बिनधास्त
गावभर हिंडत असतो मी,
एक एक आणा दवडुन
तुझ्याशीच भांडत असतो मी.

निघुन चालले मी असं
तु बऱ्याच वेळा दाखवते दमदाटीने बोलुन,
पण ढासळलेल्या घराला तुच
तर ठेवतेय झेलुन.

तु नसलीस तर माझ्या घराचे
दरवाजे होतात बंद
मग शोधता शोधता
तुला, बुडत जातो
उगवलेला चंद्र.