गोष्ट प्रेमातील रुसव्याची

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 24, 2017, 06:44:02 AM

Previous topic - Next topic
रात्र रात्र मला झोपचं आली नाही
तुला काय कळणार
विरहात किती त्रास होतो
विरहाचे चटके कधी तू सोसणार

कोण होत काय माहित
प्रेमाच्या सागरात विष टाकणार
आपलंच जवळच आहे कोणतरी
मी ओळखून सुद्धा ओळख नाही देणार

तुटले स्वप्न तुटल्या प्रेमाच्या आठवणी
काय गरज आठवणी  लिहून ठेवायची
माझी सोबत नका देऊ कोणी
गोष्ट आहे ती फक्त प्रेमातील रुसव्याची

रुसवा काढण्याची तयारी केली
पण ती सोबत नाही देणारं
जरी रुसवा काढला तुझा
शेवटी प्रेमाचा तू बाजार मांडणार

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर