गझल

Started by yallappa.kokane, May 24, 2017, 09:56:01 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

गझल

येथे महत्व मोठे जन्मास फार आहे
दुःखास मीच आता केलेच ठार आहे

पेरून कर्ज झाले धान्यास भाव नाही
पर्याय शेवटाचा फाशी तयार आहे

कोणी कधीच नाही आलेच साद देता
स्मशान दाखवाया गर्दीच फार आहे

संभाळुनी जगावे वाटे मलाच आता
माझ्याच माणसांच्या शब्दात वार आहे

झालेच बंद आहे दारे पहा मनाची
का आज हे घराला मोठेच दार आहे?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मे २०१७

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर