!! लग्नाचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा:आई बाबा🎂 !!!

Started by sneha kukade, May 25, 2017, 01:56:22 AM

Previous topic - Next topic

sneha kukade

कधी हट्ट माझा
कधी थाप तुमची  !
कधी काळजी तुमची
कधी राग माझा !

का ? त्या दूर पाखरांना
आठवण घरट्यांची व्हावी !
मायेचा कवेत निजूनी
दुःख सगळी विसरावी !!

कधी धीर सुटला
पण हात तुमचा सुटला ना !

कधी हरविले जगांनी
पण हरू दिले  तुम्ही ना  !

आज शब्द माझे लिहताना
न पुरावे !
पांग तुमचा मायेचे फिटता न फिटावे !

साथ तुमची तुम्हाला अखंडित राहो !
सात जन्मी आम्हाला फक्त तुमचीच कूस लाभो !

!! लग्नाचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा !!!