एकटा मी उरलो...!

Started by Ravi Padekar, May 25, 2017, 09:53:21 AM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

एकटा मी उरलो...!

बंद करुनी खेळ सारा
आज पुन्हा मी हरलो...
सोबत तुझी हवी मला
आता एकटा मी ग उरलो...

गुंतलो होतो बंधनात साऱ्या
शब्दांना ही मी मुकलो
थोडे घे ग समजून मला,
नाही मी ग चुकलो...
सोबत तुझी हवी मला
आता एकटा मी ग उरलो...

बरसून आले मेघ सारे
त्यात मी हि ढासळलो
न दिसावे आसवे म्हणुनी
पावसात एक झालो

गळून पडले सारेच क्षण
मी पानावानी सुकलो
दूर करुनी झोप नाही.
मी वेदनेने झुकलो...
सोबत तुझी हवी मला
आता एकटा मी ग उरलो

--रवि पाडेकर.
-८४५४८४३०३४.