खरं सांगायचं झाल ना

Started by Rahul Ghorpade, May 25, 2017, 07:19:38 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

खरं सांगायचं झाल ना मला
आता करमतचं नाही
मन माझं आता कशातचं लागत नाही
भावनांचा माझ्या मला
आता थांगच लागत नाही..

मनात सारखी किलबिचल चालु असते
मन माझं सारखं कशाच्या तरी शोधात असतं
प्रश्न माझी असतात आणी उत्तरे तुझी असतात
प्रश्न तसे कठीण असतात माझे
पण उत्तरे तुझी फारचं कटक्ष असतात...

तुझ्याशिवाय माझा एकही
क्षण आता सुखाचा जात नाही
तस तर तो एकही क्षण आता
माझा असुनही माझा राहत नाही

तुझ्याविणा जगणं मला
हे नकोसं आहे आता
पण आठवणींचा छंद तुझा
आता अविस्मरणीय आहे माझा
विरह तुझा आता माझ्या
ह्रदयावर घात करीत आहे
विरहातील प्रत्येक क्षण सहन
करून मी देणार आता
माझ्या प्रेमाची साक्ष आहे...

♡...राहुल घोरपडे...♡