आई मला कुशीत घे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 26, 2017, 06:44:48 AM

Previous topic - Next topic
आई मला कुशीत घे
मायेची ती ऊब दे
काय चुकलं गं आई माझं
स्त्री जन्माचे हाल तरी कळू दे

तू पण एक स्त्री आहेस मला
जगातली माणुसकी कळू दे
कोमल पायांनी घरात येईल मी
निदान भावाची बहीण होऊ दे

लक्ष्मी येईल घरात गं आई
घरात चिमुकल पाऊल माझं येऊ दे
घराचं घरपण मला पाहू दे
खूप ओढ लागली मायेची सावली दे

आनंदाला उधाण येईल घरात
माझ्या असण्यानं थोडस मला सजू दे
किती दिवस राहील मी घरी तुझ्या
एखादया चांगल्या घराची सून होऊ दे

संसार रुपी सागरात पोहयचंय मला
जीवन जगण्याची इच्छा पूर्ण होऊ दे
एव्हडी इच्छा पूर्ण होण्यासाठी
मला गर्भात तुझ्या वाढू दे

मला गर्भात मारू नको गं आई
मला तुझ्या सारखी एक स्त्री होऊ दे
तुला वंशाचा दिवा हवाय ना
मला पण वंशाची पणती होऊ दे


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर