एकांत ना मज कधी भासला

Started by कदम, May 26, 2017, 09:00:20 AM

Previous topic - Next topic

कदम


मी नव्हतो कधीही एकला
झुंडात प्राण होता रंगला
एका  परि एक संग चांगला
एकांत ना मज कधी भासला

नाही कधीही देह दमला
एकात्मतेत हात गुंफला
सोडण्या तो कधी ना जमला
सांगाती सवे प्राण होता दंगला

जैसा वैरी काळ माजला
तैसा त्यासी फाळ लावला
प्रेमजीवानाचा गळ होता घावला
एकांत ना मज कधी भासला