ओसंडून मेघ वाहेल

Started by कदम, May 28, 2017, 10:16:55 PM

Previous topic - Next topic

कदम


ओसंडून आता मेघ वाहेल
येईल आता वर्षाकाल
करेल थेंब थेंब बहाल
आगमनाने पावसाच्या
नदी-नाल्यात घुमतील सुरताल

होईल आता पाल्लवीत शिवार
येईल आता वर्षाकाल
बरसेल ओथंबून मेघ ञिवार
आगमनाने पावसाच्या
धरञी सर्यांनी चिंब भिजणार

पशू-पक्ष्यांना आता मिळेल प्राण
फुले-पाखरे आता एक होतिल
गातील मंजूळ गाण
आगमनाने पावसाच्या
वसुंधरा फडकवेल आनंदोत्सवाचे निशाण

विज गर्जनेचा आता होईल एकसुर
पृथ्वीगोलस येईल नवा बहर
पाण्याचा चोहिकडे होईल पुर
आगमनाने पावसाच्या
नवचैतन्य जीवनात पसरेल सर्वदुर