तनमन

Started by Asu@16, May 29, 2017, 12:24:29 AM

Previous topic - Next topic

Asu@16

    तनमन

तनमनाचे अंतर
जसे जंतर मंतर
तन वसते भूवरी
मन विहरे अंबरी
कधी स्वप्नांच्या देशात
कधी परीच्या वेशात
मन तनाचे वसन
क्षणाक्षणात फॅशन
मन अश्रूंचा सागर
मन अग्नीचे आगर
मन निर्गुण निराकार
तन सगुण साकार
तनमनाचा संसार
एकाविना अंधार
तनवृक्षाच्या अंगावर
मनवेलीचा पसार
नाती देहाची सकळ
मन करिते विफल
करी जवळची दूर
अन् दूरची जवळ
तन मनाचा आधार
मन तनाचा विचार
ऐसे देहाचे घरी
मन असे कारभारी.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita