या सांजवेळी

Started by Kumar Sanjay, May 29, 2017, 11:21:00 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

या सांजवेळी नको वाजवू पावा
व्याकूळ सुराने जीवही तुटत जावा

तुझे सावळे रंग कांलिदीवर भासले
रे! गीत स्मरणाचे ओंठावर आले

सोडून गेला भराभर किती मागे
राधेची वाहणारी आंसवे सांगे

डोळ्यांत प्रतिक्षेची अधुरी विराणी
अलवार संध्येत मिटते सावळी कहाणी

# कुमार संजय

7709826774