कवी

Started by Rahul Ghorpade, May 29, 2017, 08:18:14 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

कवी आपल्या विचारांतुन
ते मांडतो आपल्यासमोर
ज्या पासुन आपण अपरिचीत आहोत

कवी आपल्या कल्पनांतुन ते लिहीतो
जे निसर्गाच्या सानिध्यात दडलेलं आहे

कवी आपल्या शब्दांतुन आपल्याला
त्या नात्यातील सत्य दाखवतो
ज्या नात्याला आपण फक्त मतलबांसाठी
आणी आपल्या स्वार्थांसाठी जोडतो

कवी आपल्याला त्या निसर्गाच्या अनोख्या
आणी आपल्याला अनोळखी असलेल्या
सत्याला शब्दांत लिहुन दाखवतो

कवी आपल्या कल्पनांतुन विचारांतुन आणी
त्याने घेतलेल्या आयुष्यातील अनुभवांकडुन
त्या कडु सत्याशी आपली भेट घालुन देतो
ज्या सत्यापासुन आपण आपलं तोंड फिरून बसतो

कवी आपल्या शब्दांतुन त्या भावनांना लिहीतो
ज्या भावना आपण फक्त स्पर्शानचं ओळखु शकतो
कवीची विचार शक्ती कल्पना शक्ती आणी
भावनांना शब्दांत लिहीण्याची कला
ह्या तीन गुणांन मुळ कवीची एक अदभुतच ओळख बनते

♡...राहुल घोरपडे...♡