काचपात्र

Started by विक्रांत, May 29, 2017, 10:42:48 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


कशास उगा दु:ख बाळगू 
काचपात्र ते फुटले आहे 
जपले प्राणपणे तरीही   
आता हातून निसटले आहे   

नव्हता खेळ शब्दही खोटे   
तुजसाठी जे लिहले आहे 
जळले रक्त नि सुकले अश्रू   
शब्द त्यातूनी उमटले आहे   

क्षणात चिडणे क्षणात हसणे 
मी नयनी साठवले आहे 
अन तुझे ते भिरकावणे ही     
अंगवळणी मज पडले आहे 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in