जाणतो न मी तुला

Started by विक्रांत, May 29, 2017, 10:49:20 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

 

अजूनही मुळी जाणतो न मी तुला
अजूनही जरी भेटलो न मी तुला 
तरी का वाटते आतून या मनाला
प्रभू तूच माझा जो भेटतो युगाला

देह जन्म जरी कुठे वाहून गेला   
आतल्या खुणात जीव ओढावला

तू तो तसाच मी मनात पाहिला
प्रेममय स्नेहमय ह्रदयात जपला

तू जरी मुक पाषाण अबोल कोरला 
गुणगंध रुपरंग सारे मीच सजविला 

असो छंद काही वा आधार जीवा
परी अंत माझा तुझ्यातच व्हावा


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मिलिंद कुंभारे