तू पुन्हा दे मला साद

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 30, 2017, 08:53:48 AM

Previous topic - Next topic
तू पुन्हा दे मला साद
प्रेम करणं हाच माझा नाद
टाळून पुन्हा ते वाद
आता झालाय मला बोध

आता बोलना जरा माझ्याशी
विसरून ते रुसवे
राज मनातले खोलना
जरा माझ्या पाशी

विखुरलेल्या हृदयाच्या
तारा जोडना तू जराशी
चंदनापरी सुगंध प्रेमाचा
तू देना माझ्या मनाशी

एकदाच जवळ बोलावून
तू घेना उराशी
वाट पाहून थकलो आता
ये ना पुन्हा त्या रस्त्याशी

उभा आहे मी तुझ्या दाराशी
किती दिवस तुज विन राहू मी
जरा दोन शब्द तरी बोल माझ्याशी
किती दिवस वाट पाहू मी

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर