कालगमन

Started by कदम, May 30, 2017, 11:51:34 AM

Previous topic - Next topic

कदम


गाव मागचा भुतकालीन
गाव पुढचा स्वप्नांचा
पाऊले अडखळती माझी
कालगमनाच्या वाटेवरती

नाती गोती हाक देती
ऊभी राहूनी गावच्या वेसीवरती
वळुनी मागे माझा वर्तमान पाहतो
दाटून येतो भाव त्याच्या अंतरीचा
जो भविष्यकालात रमतो...!