खोट्या प्रेमासाठी जीव नको देऊस मित्रा

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 31, 2017, 09:47:57 AM

Previous topic - Next topic
खोट्या प्रेमासाठी जीव
नको देऊस मित्रा
आई बापाचा जीव आहे
तुझ्यावर त्यांचा तरी
विचार कर लेकरा

जीवन दिलंय देवानं तुला
जगण्यासाठी एव्हड्या
लवकर जीवनाला नको
होऊस तू भित्रा
तळ हाताच्या फोडा प्रमाण
जपलंय त्यांनी तुला लेकरा

प्रेमाचं काय आज आहे उद्या नाही
पैश्याची जो पर्यंत नांदी आहे
तो पर्यंत तुझ्या सोबत तिची चांदी आहे

खोट्या प्रेमासाठी जीव
नको देऊस मित्रा
बहीण आहे तुला जरा
तिचा तरी विचार कर लेकरा
तू गेलास तर तिला
आधार कोण देईल मित्रा

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर