कविता ॥ ती पाम्बरून गेली , उभं मन पार आज ॥

Started by siddheshwar vilas patankar, May 31, 2017, 04:13:55 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



ती पाम्बरून गेली

उभं मन पार आज

डोळे जड झालं माझं

वाहून आठवणींचं ओझं ॥

नाय खताची गरज

नको पाऊस कसला

पिरमाचं पीक आलंय मॉप

जव्हा चेहरा त्यो दिसला ॥

डोळे शोधी दिनरात

बनुनी खिल्लारीची जोडी

नांगर टाकलाय कवाच

उरलोय नावापुरता गडी ॥

कुठं चालतोय कळंना

डोळा नेई तिथं जातोय

भैरोबाला नारळ दिलं

तरी पान बी हालंना ॥

कधी पडशील पाऊस ?

माझ्या अंगणी पिरमाचा

आता धीर सुटतंया

जरी म्या भक्त भैरोबाचा ॥ 

मला वाटली ती सीता

म्हणून धावलो मागून

जव्हा नजरेआड झाली

फिरलो माघारी वैतागून ॥

किती घोर तो लागला

डोळा पाहून थकला

वाट कोरडी ती झाली

आत दुष्काळ जणू पडला ॥

आता जगू कशापायी ?

जीभ जड झाली माझी

गेली हसून दुरून , पार मन पाम्बरून

खोल जखम जी झाली , ती आजही हाय ताजी ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C