आगमन

Started by कदम, June 01, 2017, 10:46:59 PM

Previous topic - Next topic

कदम

गर्जना मेघांची । कडकडाटात ।
होतसे वीजेच्या । आगमन ।।
रिपरिप करी ।रिमझिमे थेंब ।
उगवते कोंब । पावसात ।।
निळेक्षार होता । तलाव जलाने ।
प्रफुल्लित होई । वसुंधरा ।।
पाने फुले डौले । खळखळ वाहे ।
जलधारा वारा । श्रावणात ।।
आगमन सृष्टी । पावसाचे होता ।
संतुष्ट होतसे । वसुंधरा ।।