कविता ही रुसेल माझ्यावर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 02, 2017, 11:38:45 AM

Previous topic - Next topic
रोज आरशात डोकावून
स्वतः ला निहाळत असतो
माझ्या प्रेमाला मी त्यात
रोज शोधत असतो

हरवलेला असतो मी
नेहमीचं तुला शोधण्यात
तुला पाहतो नेहमीच
चेहऱ्यावरच्या आनंदात

हृद्यासारखं मी नेहमीचं
आरशाला असतो साफ ठेवत
एक दिवस तरी तू दिसशील
माझ्या हसऱ्या चेहऱ्यात

गुंततो नेहमीच शोधण्या तुला
कवितेच्या प्रत्येक ओळीत
ती ओळ ही देते तुला
शोधण्यासाठी मला सोबत

प्रेमात एव्हडा वेडा झालो
की कविता ही रुसेल माझ्यावर
तिची पण सोबत असते ना मला
तू माझ्या सोबत नसल्यावर


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर