मज कळेना आज काही

Started by Rahul Ghorpade, June 02, 2017, 02:48:04 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

जीवाला जीव आज का लागला
या डोळ्यांत आज का भाव जागला
काळजावर आज का घाव झाला
जीवनाचा हा आज का प्रवास थांबला

मज कळेला आज काही
जीव माझा का भांबावला
ह्रयातल्या यातनांचा
थांग आज का लागेणा

अश्रु डोळ्यांत आज का तरळले
भावनांचे डोंगर आज का कोसळे
वेदनांचे काहुर आज का उठले
कसली ही पीडा मला आज का होते

अंगावर माझ्या शहारे आले
जेव्हा मी तुला आज पुन्हा पाहीले
तु दिलेल्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या
आठवणीतले क्षण जेव्हा डोळ्यासमोर आले

♡...राहुल घोरपडे...♡