सुगंधीत पाणी

Started by yallappa.kokane, June 02, 2017, 11:46:34 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

सुगंधीत पाणी

नाही जमले प्रेम करण्यास
रंगीत अशा या जीवनावरी
नवीन कोरे कपडे पांढरे
शेवटी कशास हो देहावरी?

आता कशास सांगा येते?
मज आठवून डोळ्यात पाणी
झाले जगून, संपले जीवन
शेवटी कशाला सुगंधीत पाणी?

ऐकली नेहमीच जगताना मी
रटाळ सारी ती जीवनगाणी
कधीच ना ती कोणी माझी
ऐकली होती जीवन कहाणी

जरी दिले सुख मी सार्‍यांना
होते रुसले सारे माझ्यावरी?
आता कशास उधळीत आहे
शेवटी फुले सुगंधी  देहावरी

अडकलो होतो बंधात नात्याच्या
सार्‍यांना संभाळत जीवन गेले
आहे आभार सार्‍यांचे माझ्यावर
अग्नी देऊन मज मोकळे केले

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ जून २०१७

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर