* नाही जमणार मला *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 02, 2017, 11:55:10 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


मला माहिती आहे गं
आता कुणीतरी आहे
जो माझ्या जागी
तुझ्या ह्रदयात बसलाय

पण माझं काय गं
माझ्या ह्रदयात तर
आजपण तुच आहे ना
तुला मी कसं बदलवणार

नाही म्हटलं तरी मी
तुझी जागा कोणाला देणार
कारण मला माहिती आहे
ते मला नाही जमणार

तु बदलली म्हणुन काय
मी पण बदलायचं !
तु विसरलीस म्हणुन काय
मी पण विसरायचं ?

नाही ग नाही जमणार मला
कारण मी प्रेम केलंय गं
अगदी मनापासुन केलंय
अन फक्त तुझ्यावरच केलंय
             म्हणुनच
तुझ्यासारखं बदलुन जायला
कि विसरुन जायला
खरंच नाही जमणार मला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938