खोटी अपेक्षा करत गेलो

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 03, 2017, 01:44:40 AM

Previous topic - Next topic
अपेक्षा पूर्ण करत गेलो
इथंच कुठं तरी चुकलो
खोट्या प्रेमाच्या सावली खाली
स्वतःला फसवत गेलो
माझ्या हृदयाचं खेळणं केलं तिनं
चालता चालता पायाला
ठेच खात गेलो
का होतं असं प्रेमात
प्रेमाच्या या खोट्या
सागरात मी खोटी
वाट शोधत गेलो
अगदी हृदय काढून द्यायची
वेळ आली तरी तिच्या
खोट्या नजरेत मी माझ्यासाठी
थोडंस प्रेम शोधत गेलो
माझ्या खऱ्या प्रेमा पोटी
तिला समजवतांना पाया
पडायची वेळ आली तरी
तिच्या कडून थोडं तरी
प्रेम मिळेल ही खोटी
अपेक्षा करत गेलो

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर