त्या तीन दिवसांनी...

Started by धनंजय गवळी, June 03, 2017, 04:10:38 PM

Previous topic - Next topic

धनंजय गवळी

काॅलेज मध्ये प्रवेश घेतला;
त्या तीन दिवसांनी...
ती मला भेटली,
प्रेमाची ठिणगी ह्रदयात पेटली.

पहीली भेट झाली;
त्या तीन दिवसांनी...
मी प्रेमाची भावना व्यक्त केली,
लगेच हो म्हणुन ती सुद्धा तयार झाली.

त्या दिवसानंतर दर;
त्या तीन दिवसांनी...
भेट आमची व्हायची,
नाही रे सोडनार तुला ती म्हणायची.


घरी सांगितली तिने आमच्या प्रेमाची कहाणी;
त्रासवले तिला खुप तिच्या घरच्यांनी,
भेटली मला ती परत मग;
त्या तीन दिवसांनी...

शेवटची ठरली ती भेट,
ती बोलली मला थेट:
अपेक्षा झाल्या सगळ्या भंग,
संपला आपला प्रेमरंग.
समजुन घ्याव आता आपल्या मनांनी;
मी नाही भेटनार आता,
त्या तीन दिवसांनी...
त्या तीन दिवसांनी...🚶🏻‍♀

~धनंजय गवळी