शेतकरी संप

Started by Khagendra, June 03, 2017, 11:24:28 PM

Previous topic - Next topic

Khagendra

टपरी

दुसऱ्यांना कोसण्याऱ्यांपेक्षा
मी इथे बसलेला बरा..
संप, असहकार करण्यापेक्षा
मी कुठेच नसलेला बरा...

आम्ही फक्त कष्ट जाणतो,
राजकारण तुमच्या रक्तात..
तुम्ही लाखमोलाचे,
आम्ही मिळतो स्वस्तात..

धरती आमची माय,
पाऊस आमचा बाप..
भाजीपाला रस्त्यात फेकला,
कुठे फेडणार हे पाप..

जीवापाड जे पीक जपलं,
त्याच्याशी काय सला??
मी शेतकरी आहे,
याचा अभिमान आहे मला..

किंमत तर धान्याची,
तुम्ही लावली..
आम्ही चूक केली ना दादा,
जी ही तूर लावली??

सगळ्यांना पोसता पोसता,
आता मात्र बदलतोय..
संप संप म्हणून
इथे जरा चहा पीत बसतोय...

खगेंद्र..