*****बाजारू सरकार*****

Started by shrikant.pohare, June 04, 2017, 12:52:16 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

        *****बाजारू सरकार*****

बाजार मांडत होतो पोटा पाण्यासाठी
सरकारनी आज आमचाच बाजार मांडलाय

शेत पिकवता पिकवता संसार माझा मोडलाय
तरी सुद्धा  बे अब्रु राजकारणात लिलाव माझा लावलाय

आज पर्यंत माल कधी जात बघून विकला नाय
अन जाती बघून माल विकायला कधी संप केला नाय

वेतन आयोगाच कधी गणित कळलं नाय
7 वा वेतन आयोग आम्हाला हवा म्हणून भांडलो नाय

बँकांचे कर्जे माफ करून आम्ही काही 'माल्ल्या' होणार नाय
सरकार सहकार्य करते म्हणून आम्ही काई लंडन ला जाणार नाय

तुम्हालाच पोस्तोय तरी हा पोशिंदा झटतोय
मनाची नाही तर जनाची असू द्या मी आज संप करतोय

नको अण्णा नको तुमचा आशिर्वाद माझा मी समर्थ आहे
जाहिरातबाज सरकारला हा माझा शेवटचा पैगाम आहे

आता कस फेडु कर्ज जिथं माझ्या कष्टाला भाव नाय
अन गळफासा शिवाय शेतकर्यांना कर्जाला पर्याय नाय

-----श्रीकांत---