स्पर्श

Started by Asu@16, June 04, 2017, 07:56:17 PM

Previous topic - Next topic

Asu@16

 स्पर्श

स्पर्शाची जादू सरली
जगणे झाले बोथट
नातीगोती केवळ उरली
जगणे झाले धोपट

आयुष्य झाले निरस
धावपळीच्या चरकात पिळून
चिपाडं उरली दुःख पेटण्या
आनंद गेला जळून

कवेत घेण्या वाट बघते
बाळ राहिले बसून
आलिंगन सोडा, स्पर्श करण्या
पत्नी गेली रुसून

वृद्ध मायबाप वाट पहाती
केवळ एका स्पर्शासाठी
ऐष नको, आराम नको
स्पर्श हवा तव जगण्यासाठी

स्पर्शसुख स्वर्ग अनुभवण्या
क्षणभर तरी थांब मानवा
स्पर्शात खरोखर सुख वसते
बोल न खोटे, जगी जाणवा

स्पर्शासाठी आसुसले
पशुपक्षी मानवप्राणी
निशुल्क स्पर्श, तरी अनमोल
देवे दिधला पारसमणी

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

गौरांश

सुंदर...👌👌

अरूण सु .पाटील

गौरांश, धन्यवाद !