***** मी काय करू...?*****

Started by Shri_Mech, June 05, 2017, 12:21:36 AM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** मी काय करू...?*****


तुला आठवतंय...
तू बोलता बोलता अचानक
काही तरी विचारायचीस त्यावेळी
"ए ऐक ना..." अशी हाक द्यायचीस
ती हाक काही केल्या डोक्यातून जात नाहीये गं
मी काय करू...?


तुला आठवतंय...
तू एकदा मला एका विषयावर
मत विचारलं होतंस
त्यावेळी माझं उत्तर ऐकून तू हसत म्हणालीस
"मला वाटलंच होतं तू असंच म्हणणार..."
ते तुझं हसू अजूनही कानात घुमतंय गं
मी काय करू...?


तुला आठवतंय...
माझ्या वाढदिवसाला तू wish करायला विसरलीस
पण दुसऱ्या दिवशी फोन वर
कितीदा "sorry" म्हणालीस....
तुझं दीनवाण्या आवाजातलं "sorry"
अजूनही स्मृतीतून जात नाही गं
मी काय करू...?


तुला आठवतंय...
मी एक चुकीचा निर्णय घेतलेला
त्यावेळी तू हक्काने म्हणाली होतीस
"खडूस, असं करायची काय गरज होती ?"
तुझं ते "खडूस" अजूनही मनात राहिलंय गं
मी काय करू...?


Shri_Mech
Shri_Mech