प्रेमकविता

Started by कदम, June 05, 2017, 01:27:55 AM

Previous topic - Next topic

कदम


खोट्या प्रेमासाठी मी
लिहीली खरी कविता
खोट्या प्रेमापाशी मी
मांडली खरी व्यथा

खोट्या प्रेमासाठी मी
केला ख-याचा त्याग
ख-या प्रेमासाठी मी
वाढवला खोटीचा हव्यास

खोट्या शब्दांनी मी
बनवली खरी कविता
खोटं बोलत बोलत
ख-याशी लढली माझी कविता..

खोट्या शब्दांनीच मी
रंगवली खरी व्यथा
खरं खोटं करता करता
मी बनवली एक प्रेमकविता.