प्रेम

Started by Devendra Parte, June 05, 2017, 09:43:03 AM

Previous topic - Next topic

Devendra Parte

प्रेम म्हणजे एक भाषा
जी नजरेने बोलली जाते
स्पर्शाने ऐकली जाते आणि
मनाने लिहिली जाते

प्रेमात असतं सुख
प्रेमात असतो आनंद
प्रेमात कुणी शोधे राधा
तर कुणा हवा मुकूंद

प्रेम करणं एवढं सोप आहे
जसं मातीने मातीवर माती लिहिणे
पण निभावनं एवढं कठीण आहे
जसं पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे

प्रेम मागून मिळत नसतं
तर ते कमवावं लागतं
जगात तसं आपलं कुणीच नसतं
प्रेमाने आपलं करावं लागतं

प्रेम म्हणजे काय ते
स्वतः केल्याशिवाय कळत नाही
प्रेम नसेल तर आयुष्याला
काही अर्थच उरणार नाही

       - देवेंद्र पार्टे