कविता ॥ होईल सर्व सुरळीत सारे ॥

Started by siddheshwar vilas patankar, June 06, 2017, 04:49:59 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


होईल सर्व सुरळीत सारे

असतील साक्षी नभी चंद्रतारे

असेन मी , नसेन मी

घडवून जाईन , बदलेल सारे

वाहतील पुन्हा प्रेमाचे वारे ॥

विरेल क्रोध लोभ सारा

मिटेल षड्रिपूंचा पिसारा

मिळेल सर्वास अन्ननिवारा ॥

कठीण ध्येय घेऊनि मनात

यत्न अविरत दानवांत

गिळून टाकेन विषाचे प्याले

वसेल  प्रेम  कणाकणात ॥


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C