***** कोमेजून गेलीस मला *****

Started by Shri_Mech, June 06, 2017, 06:37:58 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** कोमेजून गेलीस मला *****


होतीस तू पालवी माझी
नवचैतन्य भारणारी
सोडून मला गेलीस
या रुक्ष माळावरती


टाकून मला जाताना
रिते करून गेलीस
उमलणाऱ्या कळ्यांना
कोमेजून गेलीस


जरी तुझ्या मनाला
कधी ना भावलो मी
माझ्या मनात नेहमी
तुलाच ठेवले मी


नजरेआड झालीस तरी
तुलाच शोधतो मी
मिळणार नसलीस तरी
तुलाच मागतो मी


अनंताच्या वाटेवरती
मार्ग शोधताना
तू नेहमी सुखी रहावी
इतकीच माझी प्रार्थना


Shri_Mech
Shri_Mech