* तुझी जागा *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 06, 2017, 10:42:54 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


काय सांगु तुला आता
कसा राहतो ते मी
काय करणार आहेस ऐकुन
शेवटी एकटाच राहणारना मी

तुझी आठवण येऊ नये म्हणुन
दिवसभर स्वताला कामात गुंतवुन ठेवतो
राञी माञ तु स्वप्नात येशील याभितीने
मी राञभर जागत असतो

कधी कुठे मैफिलीत मी
आता पुर्वीसारखा बसत नाही
उगाच प्रेमाचा विषय निघेल
म्हणुन मी जातही नाही

शक्य तितकं मी स्वताला
आता बंधनात बांधुन घेतलंय
तुझी आठवण होईल अशा ठिकाणांना
पण मी मुद्दामच टाळलंय

तुला आवडायचं तस राहणंही
मी आता बदलुन टाकलंय
एवढच काय ग मी तर
स्वतालाही बदलुन टाकलंय

फक्त मला बदलता आली नाही
ती फक्त एकच गोष्ट आहे
ती म्हणजे तुझी या ह्रदयातली जागा
जी मला कोणाला देताच आली नाही.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938