बघ तु

Started by Rahul Ghorpade, June 07, 2017, 06:42:44 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

♡....बघ तु....♡

ओघळून येतील अश्रु तुझ्या गालावर
मी तुझ्या डोळ्यासमोर नसताना..
धावतील तुझी स्पंदने माझ्याकडे
मी तुला वाटेवर एकटा चालत दिसताना..

ओढ लागेल तुला माझी
मी तुझ्या आयुष्यात नसताना..
भास होतील तुला माझे
मी तुझ्यासोबत नसताना..

हरवलेल्या सारख वाटेलं तुला
सगळं काही तुझ्या जवळं असताना..
मी नसेल तुझ्या जवळं तेव्हा
सगळं काही तुझ्या जवळं असताना..

आठवणीत राहील मी तुझ्या आता
माझ्या सोबत घालवलेल्या क्षणांची तु
तुझ्या ह्रदयात साठवण करताना..
नेहमी आठवण काढशील तु माझी
आयुष्याच्या वाटेवर एकटी तु चालताना..

♥...राहुल घोरपडे...♥

niteshk