हे वरूण राजा

Started by कदम, June 10, 2017, 12:27:14 AM

Previous topic - Next topic

कदम


दडुन राहसी का रे मुदामून
का कोसळत नाही होऊन जलधारा

हे वरूण राजा,तु जागतो कि नाही
सुक्या नदी नाल्यांना पाणी,पाजतो कि नाही

हे वरूण राजा,बरसतो कि नाही
कोरड्या घस्यांची तहान , भागवतो कि नाही

हे वरूण राजा,मेघधारा घेवूनी येतो कि नाही
मातीत पाझरूण,गंध मृदेला देतो कि नाही

हे वरूण राजा,मेघगर्जना करतो कि नाही
ओशाळल्या भुचरास,शहारतोस कि नाही..!!