ती परी

Started by शिवाजी सांगळे, June 11, 2017, 03:21:39 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ती परी

सिग्न्ध तलम कांती
रूळले कुंतल खांद्यावरी,
गुलाबी लाली ओठी 
स्मित हास्य चेहर्‍यावरी !

सज्ज धनुष्य भ्रुकुटी
करण्या वार कोणावरी?
नेत्री कटाक्ष तिरपा
ठेवित लक्ष प्रिया वरी !

सुडौल गौर काया
देतसे उठाव वसनांतरी,
परी म्हणू कि चित्र
भास हो पाहील्या वरी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९