ओझे

Started by Asu@16, June 11, 2017, 09:35:49 PM

Previous topic - Next topic

Asu@16

       ]ओझे

हातीपायी बेड्या घालून
तुरुंगात सडत राहिलो
दार उघडल्यावर तुरुंगाचे   
सुटकेसाठी रडत राहिलो

दारूड्याचा शिक्का गोंदला
नशिबाने कपाळावर
थेंबासाठी जळत राहिलो
आयुष्याच्या सरणावर

क्रॉस घेऊन दुःखाचा
येशू चढला टेकडीवर
ऋण मेरीचे राहून गेले
पायी खिळे ठोकल्यावर

दुसऱ्याचे ओझे वाहतांना
स्वतःचे ओझे राहून गेले
मुक्कामाला पोहोचण्या आधीच
आयुष्य सारे वाहून गेले.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita