असहाय

Started by Asu@16, June 11, 2017, 09:41:20 PM

Previous topic - Next topic

Asu@16

       असहाय

पाप्यांसाठी येशू मेला
म्हणून
पाप जन्मायचे थांबले नाही

पाकींसाठी महात्मा गेले
म्हणून
पाक भांडायचे थांबले नाही

अच्छे दिनांसाठी मत दिले
म्हणून
बुरे दिन यायचे थांबले नाही

शेतकऱ्यांना कर्जमाफी केली
म्हणून
आत्महत्या व्हायच्या थांबल्या नाही

क्षुद्र मानवा काहीही केले
म्हणून
व्हायचे ते थांबणार नाही

जगण्यासाठी जन्मायचे
म्हणून
मरण यायचे थांबणार नाही

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita