तुडूंब भरलेल्या नभासारखा

Started by कदम, June 12, 2017, 11:06:27 AM

Previous topic - Next topic

कदम


तुझ्या आठवणीने मला
केलाय किती आतुर

तुडूंब भरलेल्या नभासारखा
भरलाय माझा ऊर

तुडूंब वाहणा-या नदीसारखा
वाहतोय अश्रुंचा पुर

कंठातुन उमटताहेत फक्त
विरहवेदनांचे सुर

प्रेमवेडे मन गहिवरतो ऊर
कठिण खुप राहणं

तुझ्यापासून दुर

ठोठावत आहेत
स्पंदने
हृदयातील माझ्या
माझ्याशीच होऊन फितुर