***** तितकंही अवघड नसतं ना गं...*****

Started by Shri_Mech, June 14, 2017, 06:57:31 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

***** तितकंही अवघड नसतं ना गं...*****


किती लवकर सगळं बदललं ना गं ?
तू तुझ्या वाटेला, मी माझ्या वाटेला
आपला काहीच संपर्क नाही
किती अवघड वाटलं होतं हे सगळं
पण तितकंही अवघड नसतं ना गं, नाती तोडणं ?


खूप त्रास होईल, मन मारावं लागेल,
ती रडारड, ती मुसमुस, तो एकाकीपणा,
हे सगळं किती भयंकर होईल असं वाटायचं
पण तितकंही अवघड नसतं ना गं, मन मारणं ?


तुझ्याशिवाय राहू शकेन का ?
तुला हे सगळं सहन होईल का ?
तुला माझी आठवण येत असेल का?
तितकंही अवघड नसतं ना गं, असले विचार टाळणं ?


खूपच अडकलो होतो आपण एकमेकात
पण घरासोबत वासेही फिरले, अन झाली ताटातूट
आपलं एवढं प्रेम, नाही बघवलं काही जणांना
पण तितकंही अवघड नसतं ना गं, केलेल्या प्रेमाला विसरणं?


किती काळ लोटला या सगळ्याला
आपल्या 'त्या' भावना कधीच संपल्या,
आपण आपल्या वास्तवाला चिकटलोय,
पण तितकंही अवघड नसतं ना गं, नात्याचं महत्व विसरणं?


Shri_Mech
Shri_Mech