मला हि वाटायच....

Started by umesh bhisade 123, June 15, 2017, 01:56:54 AM

Previous topic - Next topic

umesh bhisade 123

मला हि वाटायचं
तिने मला कुशीत घ्याव,
अन तिच्याच  कुशीत
मी आयुष्यभर  राहाव.....

मला हि वाटायच
तिने माझ्यावर प्रेम करावं ,
अन तिच्याच प्रेमात
मी आयुष्यभर गुंतून राहावं .....

मला हि वाटायचं
मी तिच्या जीवनात डोकावून पाहावं,
अन तेच जीवन
मी रंगवून टाकाव.....

मला हि वाटायचं
तिने माझ्या आठवणीत रडावं,
अन तिच्याच आठवणीत
मी माझं जीवन संपवाव.....

उमेश भिसडे ......