आगरी कविता

Started by pikaleved@gmail.com, June 15, 2017, 11:12:35 AM

Previous topic - Next topic

pikaleved@gmail.com

१)   निवटा
चितरान रंग लावावा कागदाला तसा
गुलगुलीत चिखल सारखा केलेला
त्यान निवटं ऱ्हेतान खारीचे मेरंला

गोल-गोल दरी-दरी त्यांची बीला
दिसतान लय भारी नंद्रला

आखा लावून पकरतांन
लय चपलायीन सटकतांन

खावाला लय भारी चईचा
बाव निवटंचा

राहतंय चिखलान मगुंन
काईक बोलतान "चिखल्या मासा"
-चंद्रकांत भोईर