गगनभरारी घे पाखरा गगनभरारी घे..!

Started by कदम, June 16, 2017, 09:15:46 AM

Previous topic - Next topic

कदम


गगनभरारी घे पाखरा गगनभरारी घे


नको अस्तित्व तुझे विसरू पामरा
नको बंदिस्त पिंज-यात होऊ
नको कैद स्वतःला करून घेवू
गगनभरारी घे पाखरा गगनभरारी घे..!

नको टपू तु दाण्या-वरती कचराकुंडीच्या
चाखण्या हो शिकारी मधुर रानमेव्याचा
नको अस्तित्व तुझे विसरू पामरा
गगनभरारी घे पाखरा गगनभरारी घे..!

वृक्ष,वेली,नदी किनारा ,निवारा हा तुझा पामरा
नको कवटाळूनी घेवु हा बंदिस्त पिंजरा
उंच उंच घे भरारी,सावडून घे जे लागेल हाताशी
गगनभरारी घे पाखरा गगनभरारी घे..!