तूटले सगळे पाश

Started by niteshk, June 16, 2017, 10:58:08 AM

Previous topic - Next topic

niteshk

तूटले सगळे पाश आपले, सूटले सारे बंध
उरल्या धुंद आठवणी, त्याही मंद मंद

नाते जुळले नव्हतेच कधी, सुटला प्रेमाचा छंद
प्रवास एकट्याचा आता, सोबत रस्ता लांब रूंद

मुक्त झाल्या साऱ्या भावना, विचार झाले बंद
भंगली सारी स्वप्ने, सरल्या त्या रात्री बेधुंद

तरला वैशाख सरला श्रावण, विरला मातीचा सुगंध
उरली ती एक सल फक्त, संपले आयुष्य सबंध

स्वलिखित.

मिलिंद कुंभारे

छान.....मस्तच .....क्या बात ..... :)

niteshk

खूप खूप धन्यवाद