तुझ्यासाठी मी दिवाना वागतो....

Started by विजय वाठोरे सरसमकर, June 17, 2017, 10:09:12 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

आता झोपण्यासही बहाणा लागतो
तुझ्यासाठी मी दिवाना वागतो .....!!

दिलामधी तुला असं जपून ठेवलं
नावासही तुझ्या मी हृदयात कोरून ठेवलं
नवचैतन्य असं मिळालं तुझ्यामुळे मला
तुझ्याचपायी सर्व मानसन्मान मला
आता झोपण्यासही बहाणा लागतो .....!! 1 !!

कधी तुला न्याहाळत बसलो मी
कधी तुझ्यावर रुसून बसलो मी
साथ मात्र तुझी मुळीच न सोडली
तुझ्यासाठी मी माझी सवयही मोडली
आता झोपण्यासही बहाणा लागतो ....!!2!!

तुला भेटण्यासाठी क्षण क्षण असतो आतुर
तू कधी भेटतेस तर कधी जातेस खूपच दूर
मग तुला शोधण्यासाठी माझी ती मदत करते
तेंव्हा कुठे तू अशी माझ्या लेखणीत बहरते
आता झोपण्यासही बहाणा लागतो ......!!3!!

आता झोपण्यासही बहाणा लागतो
तुझ्यासाठी मी दिवाना वागतो .....!!

           विजय वाठोरे सरसमकर (साहिल )
                9975593359