TO AANI PAUS

Started by Kajal More, June 17, 2017, 10:12:58 AM

Previous topic - Next topic

Kajal More

मे महिना संपून जुन महिन्याला सुरूवात झाली होती, त्याचबरोबर पावसाला ही सुरुवात झाली, आरोही हिचे कॉलेज चालू झाले होते, मे महिन्यात केलेली मस्ती संपली होती आता कॉलेज सुरू झाले असल्यामुळे पावसात जावे लागणार ह्या विचारानेच ती खूप वैतागली होती.
कॉलेज सुरू झाले आणि नेहमीसारखे पप्पा सोडायला आले, बस मध्ये बसवून ते निघूण गेले, आरोही कॉमर्स मध्ये शिकत होती, एकदम हुशार आणि दिसायला पण एकदम सुंदर की कोणीही तिच्या प्रेमात पडेल, तिचे मित्र मैत्रीण ही खूप कमी होते, तिला लगेच कोनामध्ये मिसळता येत नसे पण एकदा मैत्री झाली की मी ती जीवापाड जपायची सुद्धा....

पाऊस मात्र तिला नाही आवडायचा तिचे सगळे मित्र मैत्रीण पावसात भिजून मस्त मस्ती करायचे पण ही मात्र एका बाजूला उभी राहून पाहत बसायची, पाऊस म्हणजे तिच्यासाठी एक प्रकारचा त्रासच होता, रस्त्यात ती घाण, छत्रीचे पाणी अंगावर पडायचे, अशी तिची नेहमी तक्रारच असायची पावसाबद्दल.

ऐन पावसात तिच्या मैत्रिणीच्या घरी पूजा असते तिथे तिचे सर्व मित्र मैत्रिणी जातात, आरोही पण जाते पाऊस असला तरी खास मैत्रिणीच्या घरी जायचं आहे म्हणून नसले जायचं तरी जावे लागते. सगळे भेटून मस्ती चालू असते, तिथे मैत्रिणीचा अजून एक मित्र यश सुद्धा येतो तो सर्वाना ओळखत नसतो म्हणून ती सगळ्यांची ओळख करून देते. त्याला आरोही पाहता क्षणीच खूप आवडते त्याला करण ही तसेच होते त्यादिवशी आरोहिने छान असा चुडीदार, हातामध्ये बांगड्या, मोकळे केस आणि त्यात ही भिजलेली खूपच छान दिसत होती. यश सुदधा दिसायला छान होता पण हीच लक्ष असेल तर ना, तो आपला बघतच होता तिच्याकडे, शेवटी न राहवून तो तिच्या जवळ गेला आणि तिच्याशी बोलू लागला, बोलता बोलता कळलं की योगा योगाने एकाच कॉलेजमध्ये होते फक्त एवढेच की ही कॉमर्स आणि तो आर्टस् मध्ये होता पण कॉलेज ची वेळ सारखीच होती, राहायला सुद्धा आजूबाजूलाच होते असे कळल्यावर यश मनातल्या मनात खुश होत होता.

आरोही कॉलेजमध्ये जाताना तिच्यासोबत मैत्रिणी होत्या त्यामुळे त्याला काही तिच्यासोबत जाता नाही आले पण संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर ती एकटीच मैत्रिणीची वाट पाहत उभी होती, तेव्हा यश तिच्या जवळ गेला आणि तिच्या सोबत बोलू लागला, दोघे बोलता बोलता कधी घराजवळ येऊन पोचले दोघांनाही समजले नाही. कधीच मैत्रिणी शिवाय न जाणारी आरोही आज अनोळखी सोबत कशी आली ह्याचा विचार करू लागली, अस नेहमीच चालू राहिले, दोघे नेहमी कॉलेज सुटला की एकत्र येऊ लागले, तिला सुद्धा आता यश आवडू लागला होता हे तिला आणि तिच्या मैत्रिणीना पण कळू लागले होते त्यामुळे त्याही त्या दोघांना सोबत जाऊ देऊ लागल्या.....

असच एके दिवशी खूप पाऊस पडत होता, ती आणि यश सोबतच होते, त्यालाही समजले होते की हिला पाऊस काही आवडत नाही, पण यशला पाऊस खूप आवडायचा, पावसात भिजणे, पावसाचं पाणी उडवणे त्याला खूप आवडायचं, पण आरोहिच्या प्रेमात तो इतका बुडाला होता की त्यालाही पाऊस आवडत नाही असं वागू लागला होता, आरोहिला माहीत होत की यश ला पाऊस खुप आवडतो तो, म्हणूनच तिनेही पावसासोबत मैत्री करायचे ठरवले, मग ती नेहमी थोडे का होईना पावसात भिजू लागली, छत्री बाजूला सारून काही थेंब अंगावर घेऊ लागली, पाऊस चालू असेल तेव्हा खिडकी दारे बंद करणारी आरोही पावसाच्या धारा हातावर झेलू लागली होती, ती नकळत का होईना पण पावसाच्या प्रेमात पडली होती, न आवडणारा पाऊस तिला आवडू लागला होता आणि ही सर्व जादू होती यश आणि त्याच्या प्रेमाची, जी तिच्या चेहऱ्यावर दिसु लागली होती

हे यश सर्व तिच्या नकळत पाहत होता, पावसात तिला भिजताना पाहून त्यालाही खूप आनंद होत होता. त्याला आवडणारा पाऊस तिलाही आवडू लागला होता, अशीच कॉलेज मधून येताना तिला भिजताना पाहून यश तिच्या समोर गेला ती थोडीशी घाबरली आणि लाजली पण पुढचे दोन तीन दिवस आरोही कॉलेजमध्ये गेलीच नाही पण किती दिवस घरी राहणार ना शेवटी तिला कॉलेजमध्ये जावेच लागले. यश ला ती दिसली पण ती काहीही न बोलता निघून गेली, यशला तीच वागणे पटले नाही, कॉलेज सुटल्यावर एकटीला पाहून तो तिच्या जवळ गेला, एवढे दिवस कुठे होतीस, कॉलेजमध्ये का नाही यायचीच असे एकामागून एक प्रश्न विचारू लागला, पण तिचे एकही उत्तर नाही आले, तू पावसात भिजताना खूप छान दिसत्येस अस बोलल्यावर तिला काय बोलू कळलंच नाही, ती निघून जाणार तितक्यात त्याने तिचा हात धरला आणि तिला पकडून ठेवले, अशातच पाऊस पण सुरू झाला मग काय तो तिला त्याच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन गेला, आवडीचं ठिकाण म्हणजे त्यांचा रोजचा रस्ता म्हणजेच skywalk, त्याला तिथे पाऊस खूप आवडायचा, त्याला कारणही तसेच होते मधून आपण चालायचं आणि दोन्ही बाजूनी पाउस आपल्या अंगावर पाणी उडवायचा त्याला सोबत असायची ती झाडांची आणि हवेची..... तो सीन म्हणजे एकदम भारी आणि फिल्मी वाटायचा म्हणजे कोणीही त्या पावसाच्या प्रेमात पडेल म आरोही का नाही, दोघे तिथे आल्यावर त्याने तिला मध्ये उभे केले आणि पाऊस एन्जॉय करायला सांगितले, दोन्ही बाजूने येणारे पावसाचे पाणी तिला भिजवत होते सोबत हवा होतीच तिचे मोकळे केस उडवायला, त्यावेळेस आरोही खूपच सुंदर दिसत होती, आरोही पण पावसाचा आनंद घेत होती ते पण स्वतःला आणि सगळं विसरुन, यश फक्त तिच्याकडे पाहत होता, न राहवून यशने तिला स्वतः जवळ ओढले आणि पावसाच्या समक्ष आपल्या प्रेमाची कबुली दिली, आरोहिही खूप आनंदी होती तिनेही त्याला तीचे असलेल्या प्रेमाचा प्रतिसाद दिला आणि अशी दोघांची पावसातली प्रेमकहानी सुरू झाली, तिला न आवडणारा पाऊस तिला खूप आवडू लागला............